Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे रविवार विशेष कविता – पर्यावरण

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे रविवार विशेष कविता – पर्यावरण

0
77

झाडे लावा झाडे जगवा
हा मंत्र घ्या ध्यानी
सृष्टीचा नियम पाळा
नाही होणार हानी….

एक झाड लावा रानोमाळी
फुलेल सृष्टी पर्यावरण
मानवाच्या कल्याणासाठी
हाच खरा मार्गक्रमण

वसुंधरेच्या रक्षणार्थ सर्वं
करूया वृक्षारोपण आपण
हिरवे रानं,फुले,फळे
सृष्टी दिसेल किती फूलून

प्रदूषणास बसेल आळा
शुध्द हवा मिळेल आपणास
उत्तम राहील आरोग्य
खुशी मिळेल मानवास

मानवाच्या रक्षणासाठी
निसर्ग उभा सदैव
औषधी, भाज्या,फळे,फुले
दिले त्याने किती वैभव

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त
ठेवूया पर्यावरणाचा समतोल
प्रदूषणास घालून आळा
धरणीचा सांभाळूया तोल

सौ रंजना धर्मपाल आटे
जिल्हा वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here