Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे रविवार विशेष कविता – पर्यावरण

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे रविवार विशेष कविता – पर्यावरण

0
58

हिरव्यागार या निसर्गात आहे
पंचमहाभूतांचा वास
त्याची जपणूक करणे
कर्तव्य मानवाचे खास.

माणूस स्वत:च्या स्वार्थासाठी
करीतो अमर्यादीत वापर निसर्गाचा
वृक्षतोड,पाणी, इंधन नाही भान
डोंगर पोखरता र्‍हास जमिनीचा.

औद्योगिक क्षेत्रातील पाणी,धूर
करी नद्या ,हवा प्रदूषित
जलचरांचा अधिवास वनचरांचा निवास
येतो हो संपुष्टात..

प्लास्टिकचा अती वापर
होतो घरी दारी, कार्यक्रमात,
सुका कचरा गहन प्रश्न स्वच्छता मंत्र धरू हातात.

धरणी करते मूक रूदन
पाहून करणी मानवाची,
स्वार्थासाठी मानव करी
क्रूर हत्या निसर्गाची.

पर्यावरण जपणूक मायेने
देवू सुसंस्कार नंदादीप
पुढच्या पिढीच्या हाती
धरणीमाता खुषीत राहील खूप.

जागतिक पर्यावरण दिन
रोजच व्हावा साजरा
आनंदीत राहील सृष्टी
निसर्ग करू साजिरी गोजिरा…
साजिरा गोजिरा..

अंजली गरगटे
पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here