
वसुंधरे तुज शत शत नमन
आलाय आता कंठाशी प्राण
उतमात करुनही मानव उन्मत्त
दोष तुजला देऊनी स्वतः शांत
वृक्षतोड करुनी सागर हटवला
उंच इमारतीं कारण प्रदूषणाला
निसर्ग ना देत आता साथ आम्हाला
वसुंधरेच्या नावाने उगा शंख कशाला
स्वतःच्याच विनाशास कारण स्वतःच
दोष देतो निर्लज्ज पणाने पर्यावरणास
चला उठा बास आता रडगाणे
वृक्षसंवर्धन करुया प्राणपणाने
नको जल व्यय, नको वाळू उपसा
वसुंधरेला आनंदी करु, घेऊ वसा
जागोजागी झाडे लावू या
निसर्गाची किमया पाहूया
आपण जर खूप विचाराने
महत्त्व दिधले पर्यावरणाला
भरभरून प्रतिसाद द्यायला वसुंधरा
तयारच आहे तिचा खजिना उधळायला
(स्वरचित)
©® नीला चित्रे
चिंचवड पुणे















