
डौलदार वडाचे झाड
पशुपक्षींचे घरदार
घरात कोंबडा रुबाबदार
पर्यावरण जबाबदार….. १
काँक्रीटचे मोठे बंगले
कापून झाले सर्व जंगले
मोल नाही प्रकृतीचा
प्रदूषणात सर्व रंगले….. २
दूषित पाणी रोगराई
पाण्याची मोठी टंचाई
शेती सुद्धा वाळून जाई
करू झाडे लावण्याची घाई….. ३
सुंदर निसर्ग व वनस्पती
सर्वांची केली क्षती
आता उरली फक्त स्मृती
माणसा तुझी कशी वृत्ती….४
पर्यावरणाचे राखणदार
पिंपळ,वड नदी डोंगर
मोठे तळ आणि औदुंबर
हिरवी रान मातीचा अंबर(वस्त्र)….५
सौ.वर्षा साठे शिंत्रे
पणजी,गोवा















