
चला झाडे लावू, झाडे जगवू
समतोल पर्यावरणाचा राखू ;
करून संगोपन सा-या सृष्टीचे
सुरक्षित जीवनाची फळे चाखू.
निगा राखू निसर्गाची सदा
समजून घेऊ झाडांची वेदना ;
वृक्षतोडीस आळा घालून
जागृत करु मानवी संवेदना.
झाडातून जगण्याचा श्वास
झाडामुळेच खाण्याचा घास ;
उजळले जीवन झाडामुळेच
झाडांनाच का द्यायचा त्रास.
झाडे लावू ,झाडे जगवू
पर्यावरणाचे वाढवू सौंदर्य ;
जाणून नितीनियम सारे
सुजाणतेचे दाखवू औदार्य .
रवि ताकसांडे
गडचांदुर जि. चंद्रपूर















