डॉ. गुणवंत राठोड
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
कारंजा(लाड) तालुक्यातील नुकत्याच संपन्न झालेल्या कारंजा (लाड)उपमुख्य अधिकारी निशिकांत परळीकर यांचे नगरपरिषद सेवा निवृत्त कर्मचारी संघाच्या वतीने स्थानिक नगर परिषद कार्यालय कारंजा (लाड)येथे सत्कार करण्यात आला.या प्रसंगी अ.भा.श्री.गुरुदेव सेवा मंडळाचे आ.जी.प्रचारक नगर परीषद सेवा निवृत्त संघटनेचे अध्यक्ष संतोष केळकर कार्याध्यक्ष मधुकर तायडे कोषाध्यक्ष उभाशंकर देवघरे अरुन ठक बद्रोद्दिन मुन्नीवाले, मिरा ढोबळे, निर्मला येळने, कविता राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच या सत्कार सोहळयाल बरेच सेवानिवृत्त कर्मचारी हजर होते. निशिकांत परळीकर हे यापूर्वी कारंजा (लाड)येथे आरोग्य विभागात कार्यरत होते.त्यानंतर त्यांची बदली मुर्तीजापुर येथे कार्यालय अधीक्षक म्हणून झाली तेथून त्यांची पदोन्नती होऊन कारंजा लाड येथे उपमुख्य अधिकारी या पदावर रुजू झाले.त्यामुळे येथील स्थानिक कर्मचाऱ्यां मधून उपमुख्य अधिकारी झाल्यामुळे कर्मचारी संघटनेच्या वतीने आनंद व्यक्त केल्या जात असून त्यांची अभिनंदन केल्या जात आहे. त्यांच्या पुढील कार्या करिता संघटनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

