चंद्रपूर प्रतिनीधी
चंद्रपूर – दि.5/11/2023 रोजी “प्रोडक्शन मुंबई, नागपूर ब्राच चे वतीने रेडक्रास, भवन, चंद्रपूर येथे नवोदित कलाकार याचे वेबसिरिज व चित्रपट करिता ऑडिशन घेण्यात आले.
यशस्वी पार पडले. यात प्रामुख्याने नवोदित व अनुभवी कलाकारांनी आपले कौशल्य सादर करून छाप पाडली तर काही नवोदितांना अभिनय सादर करण्याचे पहिलेच अनुभव तर काही अनुभवी या पूर्वी चंद्रपूर या भागात निर्मित होत असलेल्या निर्मिती झालेल्या चित्रपटात काम करणारे कलाकार यांनी पण उपस्थिती दर्शून आपली कला व अभिनय सादर केला.
जवळपास या ऑडिशन मध्ये 100 कलाकारांनी संधी घेतली तर काही नवोदित बाल कलाकारांनि सहजसुचल चे मुख्य कार्यकारी संपादक याचे कडे बोलक्या प्रतिक्रिया सुध्दा व्यक्त केल्या व त्या त्यानी टिपल्या व त्याचे मनोबल व अकाक्षा ला दुजोरा दिला असल्याचे चित्र बघायला मिळाली.
यात अभिनय, डान्स, गायन, कवी, ई.कलाकाराचा सहभाग दिसून आला.
सादर ऑडिशन हे “तेजस प्रोडक्शन मुंबई. नागपूर ब्रांच चे वतीने आयोजित करण्यात आले होते तर यात संयोजक म्हणून राजेंद्र पचारे, शाम नागपुरे (फोटो ग्राफर), के.राजू यांनी परिश्रम घेऊन आयोजन केले.
यात नागपूर ब्रांचं चे अमोल दुर्गे हे प्रमुख होते.
या संपूर्ण टीम चे प्रमुख सूनील शिंदे, डायरेक्टर, निर्माता, वेबसिरीज, चित्रपट निर्माते, मुबई. हे असल्याचे दिसून आले. ते काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकले नसल्याचे आयोकां कडून माहिती पडले.
यात जितू दोषी, टॉकीज चंद्रपूर चे मालक तथा चित्रपट शेत्राशी नाड जुळणारे निर्माते यांनी सुध्दा धावती भेट देऊन शुभेच्या दिल्या.
संजय शिवरकर, चित्रपट लेखक व डायरेक्टर चंद्रपूर हे उपस्थितीती दर्शविली होती.
तर राजुरा येथील नवोदित चित्रपट लेखक ईकबाल भाई सिदिक्की यांनी शेवटपर्यंत आपली उपस्थिती सर्शविली.
तर सूविद्या बाबोडे, रोशनी, शेपाली बांबोडे सहकार्या सह फार मोलाची कामगिरी बजावली, कलाकाराचे नाव नोंदणी तर फॉर्म भरणे व सु्यवस्थेचा कार्यभार सांभाळला.
काही नवोदित वेळेत पोहचू शकले नसल्याने निरश्या त्याचे पदरी पाडली तरी कार्यक्रमाचे संयोजक यांनी त्यांना दिलासा दिला की पुढच्या वेळी संधी देण्याची शास्वती दिली.
रोटरी क्लब चे संचालक तसेच गलहोत सर,व सत्यम पीपरे चंद्रपूर यांनी हॉल उपलब्ध करून दिला.त्या चे संयोजक व आयोजक यांनी आभार मानले.
श्याम नागपुरे, चंद्रपूर यांनी ऑडिशन चे चित्रीकरण उत्तम रित्या पारपाडली. तर गणेश कार्लेकर कलाकार, नरेश चतुरकर कोरपना यांनी उत्तम मदत टीम ला केली.
यात गडचिरोली, सिंदेवाही,भद्रावती, वरोरा, गोंडपिपरी, जिवती, राजुरा येथील नविदितानी सहभाग दर्शविला.

