अंजनगाव सुर्जी नगरपरिषद मध्ये संचारला अजगर

0
105


अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी, अमरावती

अमरावती : जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगरपरिषद कार्यालयात भला मोठा अजगर संचारल्याची चर्चा सद्या नागरिकांमध्ये सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये आर्थिक भीती पूर्ण वातावरण पसरलेले पाहायला मिळत आहे.
सविस्तर माहिती अशी की, नगरपरिषद अंजनगाव सुर्जी हद्दीतील घर टॅक्स वाढीमुळे नागरिकांमध्ये असंतोष पाहायला मिळत असल्यामुळे नागरीकांच्या मानगुटीवर लादलेल्या भरमसाठ कर वाढीमुळे नगरपरिषद प्रशासन मध्ये स्वार्थी अजगर संचारला आणि प्रशासन नागरिकांना भविष्यात आर्थिक अडचण निर्माण करून गिळंकृत करण्याच्या मार्गात आहे अशी चर्चा सुद्धा शहरातील कानाकोऱ्यातून ऐकायला मिळत आहे.
मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी नागरिकांना १५ नोव्हेंबर पर्यंत तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.परंतु; नगरपरिषद प्रशासनाने आपल्या अंगावरचे घोंगडे कंत्राटदारावर टाकून भविष्यात कंत्राटी पद्धतीने वसूल करण्यात येणारा मालमत्ता कर नागरीकांच्या आर्थिक अडचणीत टाकणारा ठरणार की ज्याप्रमाणे आतापर्यंत कर्जापायी शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहायला मिळतात आता मालमत्ता कर आकारणी वरून अंजनगाव सुर्जी शहरातील नागरिकांना नगरपरिषद प्रशासन आत्महत्या करण्यास परावृत्त करणार तर नाही ना? असा प्रश्न सुद्धा नागरिकांना पडला असून प्रशासनच नागरिकांना आर्थिक अडचणीत टाकून गिळंकृत करण्याच्या तयारीत दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here