मोर्शी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
मोर्शी – उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे लहान बालकांच्या लसीकरण सेवा सत्राचे आयोजन वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. 0 ते 5 वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यात आले. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कंत्राटी आरोग्य कर्मचारी सध्या काम बंद आंदोलन करत असल्याने रुग्णालयातील उर्वरित कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे तरीसुद्धा आरोग्य कर्मचारी खूप कष्ट घेत आहेत.
यावेळी अधिपरीचारिका रूथ लोखंडे, वर्षा दारोकर, जयश्री मोरे तसेच आरोग्य कर्मचारी विनय शेलुरे, प्रशांत बेहरे, विनोद पवार, राष्ट्रपाल शंभरकर, नागोराव खंडारे तसेच उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचऱ्यांचे सहकार्य लाभले.

