परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
परभणी- लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पदाधिकारी उत्तम धायजे पत्रकार दैनिक जगदक्षाचे संपादक यांचा दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी हिंगोली वरून परभणी कडे येत असताना वसमत रोडवर भारतीय कॅम्प जवळ मोटरसायकल चालवत असताना अचानक अपघात झाला होता. या अपघातात उत्तम धायजे यांच्या डोक्याला व हाता – पायाला जबर मार लागल्यामुळे ते बेशुद्ध पडले होते. त्यांना उपचारासाठी शहरातील वसमत रोडवरील निदान हॉस्पिटल परभणी पार्वती अंभोरे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पत्रकार उत्तम धायजे यांच्यावर जवळपास नऊ दिवस उपचार सुरु असताना त्यांचा उपचारा दरम्यान निधन झाले आहे. यावेळात लोकस्वातंत्र पत्रकार महासंघाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, महाराष्ट्र संघटक तथा संपर्क प्रमुख भगीरथ बद्दर, परभणी – नांदेड संपर्क प्रमुख शिवशंकर सोनुने,पत्रकार विजय कुलदीपके परभणी जिल्हा सचिव प्रमोद अंभोरे, रुग्णहक्क संरक्षण समितीचे उपाध्यक्ष शेख सरफाराज आदींनी धायजे यांच्या वर योग्य उपचारासाठी डॉक्टरांशी चर्चा करून पाठपुरावा करत होते व वेळोवेळी पत्रकार उत्तम धायजे यांच्या प्रकृतीचा आढावा घेत होते. परंतु उत्तम धायजे यांचा उपचारा दरम्यान
दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजल्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी त्यांच्या गावी पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर या गावी करण्यात आला आहे. पत्रकार उत्तम धायजे यांच्या पश्चात पत्नी व तीन अपत्य असून या घटनेमुळे सर्व मित्र परिवार व पत्रकार संघातील पत्रकारावर शोककळा पसरली आहे. यावेळी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

