भारताचे संविधान पत्रक वाटप करून संविधान दिन साजरा

0
77

अँड. वंदना कावळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज

परभणी- आज वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र प्रणित राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्र परभणीच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त सविधान पत्रक वाटप जनजागृती करण्यात आली बालकलाकार रुद्राक्ष आवटे यांच्या हस्ते संविधान पत्रक वाटप जनजागृती अभियान राबवण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगमित्र चंपालाल देवतवाल ठाकूर, प्रमुख पाहुणे प्रगतिशील दूध उत्पादन शेतकरी नामदेवराव वाघ गुरवसमाजाचे कैलास आगलावे युवा उद्योजक कृष्णा मात्रे रवी देशमुख संविधान दिन महोत्सव कार्यक्रमाचे संयोजक लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी भारतीय संविधानाबद्दल सर्वांना माहिती दिली व आजचा दिवस कशासाठी साजरा केला जातो प्रत्येकाने संविधानाचे महत्त्व जपले पाहिजे आणि आजूबाजूच्या परिसरात दुकानदाराला व येणाऱ्या जाणाऱ्या रोडवरील लोकांना संविधानपत्रककरून साजरा करण्यात आला. याप्रसंगी 26 11 मुंबई शहरावर झालेल्या दहशवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना व शहीद जवानांना भावपूर्वक श्रद्धांजली वाहण्यात आली भारतीय संविधान बचाव भारत बचाव दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी शिवशक्ती बिल्डिंग समोर बस स्टॉप येथे रात्री आठ वाजता संपन्न झाला अशी माहिती गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here