कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधी, सिंदेवाही
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील बौद्ध समाजाची वार्षीक सभा नुकतीच मावळते अध्यक्ष गौतम मेश्राम यांचे अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळा परीसरात पार पडली. सभेमध्दे विविध विषयावर चर्चा करण्यात आले. सोबतच जुन्या समाजाचे कार्यकारिणीला निरोप देऊन नविन कार्यकारणी गठीत करण्यात आली.
यामध्ये अध्यक्ष सुनिल डेकाटे, उपाध्यक्ष विनोद अ . मेश्राम, सचिव रंजीत सि. मेश्राम, सहसचिव राजु मेश्राम तर कोषाध्यक्ष राहुल मेश्राम यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी समाजातील सर्व बौद्ध उपासक मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.

