prabodhini news logo
Home ठळक बातम्या राष्ट्रीय दूध दिवस दिन दूध उत्पादन करणारे दूध विक्रेते नामदेव वाघ यांचा...

राष्ट्रीय दूध दिवस दिन दूध उत्पादन करणारे दूध विक्रेते नामदेव वाघ यांचा सत्कार

0
220

परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

परभणी- आज राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने राष्ट्रीय दूध दिवस दिनानिमित्त परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध परळगव्हाण प्रगतीशील दूध उत्पादक नामदेवराव वाघ पाटील यांचा हार पुष्पगुच्छ देवून सन्मान सत्कार स्वागत करण्यात आला नामदेव वाघ यांनी मागील अनेक वर्षापासून गाईचे दूध म्हशीचे दूध दररोज दोन-तीनशे लिटर दररोज विक्री करतात गावरान तूप दही खवा दुधापासून अनेक प्रकार बनवून दूध उत्पादन हे शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून कार्य करतात जगातील सर्वात मोठा दूध उत्पादन देश व भारतातील सर्व दूध उत्पादकांना राष्ट्रीय दूध दिवस 26 नोव्हेंबर रोजी 2023 रोजी साजरा करण्याचे आव्हान केले त्याचे उदाहरण म्हणून आज राष्ट्रीय दूध दिन दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याचा दूध विक्री करणाऱ्या नामदेव वाघ यांचा सत्कार सन्मान स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगगुरु चंपालाल देवतवाल, प्रमुख पाहुणे गुरव समाजाचे कैलास आगलावे दूध विक्रेते कृष्णा मात्रे सोनू अवचार मस्के देशमुख बहुसंख्य दूध घेणारे व दूध देणारे दूध उत्पादक उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्र जन फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक गाय म्हैस यांच्या दुधापासून अनेक उपयोग घ्या आरोग्यासाठी पृथ्वीतलावरचे अमृते दूध आहे दूध उत्पादनाकडे जास्त व्यवसाय करा आणि गोमाता गाय म्हैस बचाव बचाव हे आवाहन केले याप्रसंगी आभार प्रदर्शन बालकलाकार रुद्राक्ष आवटे यांनी स्थळ शिवशक्ती बिल्डिंग समोर दूध दूध विक्री ते खरेदी पॉईंट वसमत रोड परभणी अशी माहिती राष्ट्रजन प्राणिमित्र गोसंवर्धन अभियान प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here