कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाही तालुक्यातील ग्रामपंचायत पेंढरी (कोके.)येथे कोकेवाडा अंगणवाडी क्रमांक १ अंगणवाडी सेविका वसुधा शेंडे यांना महिला बाल कल्याण योजने अंतर्गत सरपंच तारा अरविंद राऊत यांच्या हस्ते मोबाईल प्रदान करण्यात आला.यावेळी या कार्यक्रमाला उपसरपंच निशांत चंद्रकांत शिंदे, ग्राम पंचायत सदस्य दिवाकर चाचरकर, भक्तदास चौधरी, सचिन कराडे, ममता शेंडे, गीता भैसारे, रंजना आमडारे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

