रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज
ब्रम्हपूरी तालुक्यातील जुगनाळा येथे कार्तिक गोपालकाल्याच्या निमित्ताने विठ्ठल रुख्मिणी मोहल्ला यांच्या वतीने लावणी व डाॅन्स कार्यक्रमाचे आयोजन दि.27 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद चिमुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सहउद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ राजेश कांबळे सर हे होते.
तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज हे होते. सहअध्यक्ष म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, चौगान येथील सरपंच उमेश धोटे हे होते. उपाध्यक्ष म्हणून चौगान येथील उपसरपंच अंकुश मातेरे यांची उपस्थिती होती.
प्रमुख अतिथी म्हणून बंटी गोंदोळे, माजी सरपंच चंद्रशेखर मेश्राम, यांसह अन्य मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलतांना मान्यवर म्हणाले की, नृत्य हा सर्व वयोगटातील आणि विविध आकाराच्या लोकांसाठी तंदुरुस्त राहण्याचा एक मार्ग असू शकतो. यामध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत. तुमच्या हृदयाची आणि फुफ्फुसांची सुधारलेली स्थिती, वाढलेली स्नायूंची ताकद, सहनशक्ती आणि मोटर फिटनेस असे अनेक फायदे नृत्याचे असतात असे यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश चौधरी यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल रुख्मिणी मोहल्ला कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

