अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती
अमरावती : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे साहेब यांच्यावर तिवसा येथील शंकर पटाच्या कार्यक्रमानंतर अज्ञात हल्लेखोराने दगड फेकून हल्ला केला त्यामध्ये आमचे नेते सन्माननीय जिल्हाध्यक्ष खा.डॉ.अनिल बोंडे साहेबांना गंभीर दुखापत झाली. या भ्याड हल्ल्याचा भारतीय जनता युवा मोर्चा अमरावती जिल्हा ग्रामीण तर्फे पोलीस अधिक्षक कार्यालय येथे पोलिस अधीक्षक अमरावती मा.विशाल आनंद सिंगुरी साहेब यांना तक्रार देऊन जाहीर निषेध केला. असे कृत्य करणाऱ्या जो कोणी दोषी असेल त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून कडक कार्यवाही करण्यात यावी असे तक्रारीत नमुद करण्यात आले व त्वरित त्या अज्ञात हल्लेखोरांला अटक करावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासन यांना देण्यात आला.
यावेळी पोलिस अधीक्षक साहेबांना निवेदन देताना युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अजिंक्य वानखडे,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिताताई तिखिले, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस भुषण काळमेघ, कर्णजी धोटे, अभिजितजी मावळे, भाजप जिल्हासचिव सत्यजितजी राठोड, युवा मोर्चा उपाध्यक्ष निखिलजी घुरडे, कार्यालयमंत्री धनंजयजी उमप, उपाध्यक्ष अर्चना मुरूमकर, महिला मोर्चा सरचिटणीस साधना म्हस्के, किसान मोर्चा उपाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, मीना श्रीराव,शुभमजी सांगले,अनुजजी म्हस्के उपस्थित होते.

