तालुक्यातील रुग्णांचा भरभरून प्रतिसाद
अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती
अमरावती – (चांदुर बाजार) येथील ज्या माणसांची खरी ओळख ही रुग्णसेवेतून होते असे लोकप्रिय आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रहार संघटना चांदुर बाजार जीवन आधार सामाजिक संस्था नागपूर, शालीनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर, भाग्योदय संस्था अमरावती
यांच्या संयुक्तविद्यमाने ग्रामीण रुग्णालय चांदूर बाजार येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या महाआरोग्य शिबिराला तालुक्यातील रुग्णांनी भरभरून प्रतिसाद दिला असून यामध्ये
यावेळी ऐकून 1887 रुग्णांनी महाआरोग्य चा लाभ घेतला तर पुढील उपचार करिता डोळ्याचे ऑपरेशन 92 पेशंट ला नागपूर ला ऑपरेशन करिता रेफर केले आहे तर ईतर आजार करीता 104 हॉस्पिटल करिता रेफर केले आहे या सर्वांचे ऑपरेशन जीवन आधार सामाजिक संस्था, नागपूर, शालीनताई मेघे हॉस्पिटल नागपूर तर्फे मोफत होणार असल्याचे जीवन आधार संस्थेचे संस्थाप अध्यक्ष जीवन जवंजाळ यांनी यावेळी बोलतांना म्हटले आहे या महाआरोग्य शिबिराची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली या वेळी उपस्थित संजय देशमुख विदर्भ प्रमुख, राजेंद्र याऊल सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, जीवन जवंजाळ संस्थापकअध्यक्ष जीवन आधार, डॉ अजय ठाकरे, दीपक भोगाडे, सचिन खुळे माजी नगरसेवक, संतोष कीटूकले प्रहार तालुका अध्यक्ष,रुग्ण सेवक मुस्तोफिजूर खान माजी नगरसेवक, सुरेश सवळे जेष्ठ पत्रकार , पत्रकार सागर सवळे आंबू वानखडे, गणेश पुरोहित,प्रदीप बंड, सुयोग गोरले , घनश्याम पालिवाल, पवन वाठ, समीर साडे अध्यक्ष भाग्योदय फौंडेशन अमरावती,आधी प्रहार कार्यकर्ते, जीवना आधार सामाजिक संस्थेचे सर्व अधिकारी भाग्योदय फाउंडेशन चे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

