11 ठिकाणी होणार शिबिर, नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहण
सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहरातील विविध 11 ठिकाणी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज गुरुवार पासून सदर शिबिराला सुरवात झाली असून सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत नवीन मतदारांना येथे नोंदणी करता येणार आहे. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.
1 जानेवारी 2024 पर्यंत 18 वर्ष पुर्ण होणार असलेल्या युवकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करुण घेण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चंद्रपूर शहरातील विविध 11 ठिकाणी मतदार नोंदणी शिबीर आयोजित केल्या केल्या गेली आहे. आज गुरुवार पासून या शिबिरांना सुरवात झाली असून 5 डिसेंबर पर्यंत सदर शिबीर चालणार आहे. यात जैन भवन जवळील यंग चांदा ब्रिगेडचे जनसंपर्क कार्यालय, घुटकाळा येथील नेहरु विद्यालय, जलनगर, दाताळा शहर, पडोली, वडगाव येथील धनोजे कुणबी सभागृह, जनता महाविद्यालय, तुकुम येथील मातोश्री विद्यालय, राष्ट्रवादी नगर येथील राधाकृष्ण सभागृह, बंगाली कँम्प, बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले विद्यालय या ठिकाणी सदर शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

