सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
नुकताच विजयवाडा इथे झालेल्या राष्ट्रीय डॉक्टर्स ओलंपियाड मध्ये चंद्रपूर आय. एम. ए. ने आपला डंका वाजवला आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चंद्रपूर ने देशभरातून आलेल्या 20 उत्कृष्ट संघातून उपविजेतेपद प्राप्त केले. लीग स्टेजमध्ये आय. एम. ए. परभणी, आंध्र प्रदेश आयएमची एक टीम व विजयवाडा आय. एम. ए. ला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीमध्ये कॅपिटल्स या संघाचा पराभव करत अंतिम फेरीमध्ये कर्नाटकच्या सॅंडल वूड वॉरियर्स या संघाकडून एकदम अतिथटीच्या सामन्यात पराभव स्वीकारा लागला. कर्णधार डॉ अभय राठोड यांच्या नेतृत्वात डॉआशिष वरखेडे, डॉ. निखिल टोंगे, डॉ अनुप पालीवाल, डॉ गिरीश बोबडे, डॉ रुपेश ठाकरे, डॉ. ऋषिकेश कोल्हे, डॉ व्यंकट पंगा, डॉ निखिल माडुरवार, डॉ पराग टेंभुर्डे, डॉ. हितेश सुराणा, डॉ जय राठोड व डॉ सुदेश बाटुंगे यांनी सहभाग घेतला. डॉक्टर आशिष वरखेडे यांना सर्वोत्कृष्ट याष्टी रक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात गोका राजू गंगा राजू गारू दक्षिण प्रांतीय बीसीसीआय चे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रीय आयएमएचे अध्यक्ष डॉक्टर शरद अग्रवाल यांची उपस्थिती होती. तसेच एका सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टी रक्षक व पूर्व क्रिकेट टीमच्या सिलेक्शन कमिटीचे अध्यक्ष एम एस के प्रसाद यांनी हजेरी लावली.
याच वर्षी कार्निवल क्रिकेट चंद्रपूर मध्ये विजेतेपद, विदर्भ प्रीमियर लीग मध्ये उपविजेते पद व राष्ट्रीय डॉक्टर्स ओलंपियाड मध्ये उपविजेते पद प्राप्त केलेल्या या संघाचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन च्या अध्यक्ष डॉक्टर कीर्ती साने व सचिव डॉक्टर कल्पना गुलवाडे यांनी या पथकाच्या कामगिरीवर विशेष अभिनंदन केले आहे.

