माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले
अँड वंदना कावळे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
तालुक्यातील गवर्ला (चक) येथे नवतरुण नाटक समाज, गवर्ला (चक) यांच्या वतीने खास कार्तिक गोपालकालानिमित्त “घुंगरात रंगला पाटील” या तीन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आलं होते. या नाटकाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले.
या नाटकाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अण्णाभाऊ ठाकरे बाबुसाहेब रुई उपस्थित होते. कार्यक्रमाला सहउद्घाटक म्हणून नानाजी तुपट मा. अध्यक्ष किसान काँग्रेस सेल ब्रम्हपुरी, उपाध्यक्ष म्हणून प्रभाकरजी सेलोकर सभापती कृ.उ.बा.स. ब्रम्हपुरी, उमेश धोटे सरपंच चौगाण, भावेश दोनाडकर उपसरपंच मांगली उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून प्रा. अतुल देशकर मा.आमदार,प्रा. सालोटकर, अमीत कन्नाके शहर युवक काँग्रेस, अशोक भुते निलज, देविदास कार अध्यक्ष तं.मु.स. जुगनाळा, विनोद सहारे अध्यक्ष से.स.सो. जुगनाळा, गोकुलदास कार माजी उपसरपंच मांगली, अतुल सोंडवले ग्रा.प. सदस्य मांगली, दिनेश कामडी ग्रा.प. सदस्य मांगली, खुशाल दोनाडकर अध्यक्ष तं.मु.स.मांगली, चंद्रकांत राऊत मांगली, निकुरे पाटील गवर्ला, टीकाराम ठाकरे रुई, आशिष प्रधान मांगली, प्रमोद सोंडवले मा. उपसरपंच गवर्ला, विलास लोखंडे, काशिनाथ कार, माधोजी कामडी, विजय मानकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या नाटकाच्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, कार्तिक पौर्णिमा हा कार्तिक मासातील पूर्णिमेला साजरा होणारा सण आहे. आपल्याकडे कार्तिक पौर्णिमेला गोपाळकाल्याचे आयोजन केले जाते. कार्तिक पौर्णिमेला ‘देव दीपावली’ म्हणूनही संबोधले जाते. आपल्या धार्मिक परंपरेमधे कार्तिक पौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व आहे. या शुभदिनी आपण गावात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी जे गावच्या कलाकारांनी जे नाटकाचे आयोजन केले आहे ते केवळ मनोरंजनासाठी नसून या नाटकाच्या माध्यमातून आपल्याकडे असणारी नाट्य संस्कृती, परंपरा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहात. हे खरच अभिमानास्पद बाब आहे.
कार्तिक पौर्णिमेला खास कार्तिक गोपालकालानिमीत्त नवतरुण नाटक समाज, गवर्ला (चक) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नाटकाचा गवर्ला (चक) येथील जनतेने आनंद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

