बाजीराव मस्तानी च्या नावावरून उठला सवाल
सामाजिक संघटना आक्रमक
अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती
अमरावती – राज्यभरात गुटखाबंदी आहे. आणि ती केवळ कागदावरच असल्याचे येथील चित्र आहे. म्हणूनच की काय? गुटखा माफीया आणि तस्करांनी जिल्ह्यातच नव्हे तर जिल्हा बाहेर सुद्धा चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यांच्यावर कुणाचा वचक नसल्यामुळे बाजीराव सारख्या महान अयोध्या च्या नावाचा गैरवापर केला जात आहे. यामागे गुटखा माफिया जावेद याचे नाव जोरदार चर्चेत असताना त्या गुटखा माफिया चा बायोडाटा प्रशासनाला का शोधता आला नाही हे एक कोडेच आहे.
सगळीकडे तंबाखूजन्य सुगंधित गुटखा पुड्यांची चंगळ आहे. त्यात बाजीराव या शूरवीर ऐतिहासिक नावासोबतच मस्तानी ची तंबाखूपुडी हा विषय सध्या काही राजकीय आणि सामाजिक संघटनेच्या चांगला जिव्हारी लागला आहे. त्याचप्रमाणे नजर ५०००, नजर ९०००, हॉट, आधी सारख्या गुटखा पुड्यांचा साठा सगळीकडे मुबलक आहे. या गुटखा माफियांचे गोदामे खचाखच भरले आहे. बडनेरा अमरावती सारख्या शहराबाहेरील गोदामातून रात्रीच्या काळोखात गुटखा तस्करीचा खेळ चालत आहे.
हा एवढा मोठा गोरख धंदा संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या छाताड्यावर बसून खुलेआम चालू आहे. त्यातील माफिया जावेदचा चांगलाच बोलबाला आहे. अमरावती हे विभागीय प्रशासकीय स्थळ आहे. येथे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, एस पी, सीपी, तथा अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आपल्या कार्यालयातून प्रशासन हाताळतात. अगदी त्यांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या परिसरात गुटखा माफिया जावेच नाव सर्वत्र चर्चेत असताना ते नाव प्रशासनाला ऐकायला मिळाले नाही का? किंवा ते नाव रुपयाच्या बंडलाखाली दबले केले का? एकट्या अमरावती जिल्हा पुरताच जावेदच्या गोरख धंद्याचा पसारा नाही तो जिल्हा बाहेर विस्तारला आहे. ज्यामध्ये यवतमाळ, वाशिम, अकोला, वर्धा, नागपूर जिल्ह्यात जावेदच्या गुटखा तस्करी सहकाऱ्यांचा उच्छाद आहे. एवढ्या मोठ्या नेटवर्कचा धागा प्रशासनाच्या हाती अद्यापही का लागला नाही याचा उलगडा होण्याची गरज आहे. म्हणूनच त्याची पोलखोल आम्ही छत्रपती संस्कार मधून निर्भीडपणे मांडत आहोत.
दिग्गजांसोबत जावेदचे उठणे-बसणे
जावेद हे नाव तस्करीच्या माध्यमातून सगळीकडे पसरले आहे. माफिया जगतात त्याची एक विशेष ओळख आहे. सर्वसामान्यांच्या ओठावर त्याचे नाव आहे. आणि त्याला कारणीभूत येथील संपूर्ण यंत्रणा आहे. राष्ट्रीय, राज्य स्तरावरील काही राजकीय पक्षाचे पुढारी सुद्धा त्याचे नाव गर्वाने घेतात. ही एक शोकांतिकाच आहे. विविध पक्षाच्या काही राजकीय पुढार्यांची हफ्ते बांधणी हे त्याला मुख्य कारण आहे. आणि म्हणूनच एवढा मोठा गोरख धंदा येथे चालला असताना काही राजकीय पुढारी त्याविरुद्ध एकही शब्द बोलायला तयार नसल्याचे भयान वास्तव आहे. यामध्ये विविध विभागातील काही अधिकारी सुद्धा लिप्त असून त्यांच्यासोबत उठणे बसणे ही त्या माफी याची दिनचर्या आहे.
प्रसिद्धी माध्यमांचा आवाज दबला
देशातील तरुणाई गुटक्यातून व्यसनंध होत आहे. त्यापासून होणाऱ्या कर्करोगासारखा जीवघेणा आजार वेगाने पसरत आहे. त्यावर आळ बसावा म्हणून शासनाने तंबाखूजन्य पदार्थावर बंदी घातली आहे. मात्र गुटखा तस्करीचा हा गोरख धंदा चांगलाच फोफावला असताना काही प्रसिद्धी माध्यमांनी मात्र याविषयी अबोला धरला आहे. गुटखासारख्या जीव घेण्या व्यसनाविरुद्ध आवाज उठवणे हे प्रसिद्धी माध्यमांचे सामाजिक दायित्व आहे. परंतु जावेद सारखा व्यक्तीच या धंद्याचा बॉस असल्याने त्याच्याकडून मिळणाऱ्या हप्ता आणि काही महागड्या भेट वस्तूच्या वजनाखाली प्रसिद्धी माध्यमांचाही आवाज दबला गेला आहे.

