सरकारी स्वस्त धान्य वितरक व केरोसीन विक्रेत्याच्या प्रश्न विधानसभेत माडंणार – आमदार यशोमती ठाकुर

0
196

अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती

विद्यमान सरकारच्या नाकर्तेपणामुळे विकास ठप्प झाला आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना मदत देण्याचा विषय असो कीं, स्वस्त धान्य दुकानदार वं केरोसीन परवाना धारक यांच्या समस्या प्रश्न असो याबाबत सरकारची नियत साफ नाही. सकारला सरकारी स्वस्त धान्य वितरण व्यवस्था मोडीत काढायची आहे. पण आम्ही तुमच्या सोबत असून हा प्रश्न विधानसभागृहात माडंणार असल्याचं आमदार यशोमती ठाकुर म्हणाल्या. त्यांनी आज 1 डिसेंबर रोजी आपल्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार वं केरोसीन परवानाधारक महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळाला भेट देऊन चर्चा करतानां आपला आंदोलनाला पाठिंबा असल्याचं त्या म्हणाल्या.

यावेळी आमदार बळवंत वानखडे सुद्धा उपस्थित होते. आमदार यशोमती ठाकुर सरकारवर टीका करतानां म्हणाल्या कीं हे अवलक्षणी सरकार आहे. हे सरकार राज्यात सत्तेत आल्यापासुन विकासाला खिळ बसली आहे. खोटी आश्वासणे, विकासाचा फक्त आभास, निधी वाटपात प्रचंड पक्षपात करणाऱ्या या सरकारच्या मनातचं खोटं आहे. शेतकरी मरतोय मरू दे, व्यवसाय बुडतात बुडू दे, फक्त आपलं चागभलं झालं बस्स इतकंच या सरकारच धोरण असल्याची टीका करून त्या म्हणाल्या कीं. सरकार भलेही शेतकऱ्यांच्या जीवावर उठले असेल, स्वस्त धान्य दुकानादार व केरोसीन परवानाधाराक यांच्या विषयी मनात खोटं असली तरी आम्ही मात्र तुमच्या पाठीशी आहोत. शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वचनबद्ध आहोत. गरज पडली तर यासाठी रस्त्यावर उतरू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच हा प्रश्न येऊ घातलेल्या अधिवेशनात मांडणार असल्याचं त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here