सोनाली कोसे
तालुका प्रतिनिधी
नागभीड
नागभीड- दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी मौजा पाहार्णी ता. नागभीड जि. चंद्रपूर येथे नवयुवक नाट्य कला मंडळ, पाहार्णीच्या वतीने आयोजित “धागा एक बंध प्रेमाचा” या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांनी मोदी सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट झाले नाही मात्र खताच्या, कीटकनाशकाच्या, बियाण्यांच्या किंमती वाढल्यामुळे उत्पादन खर्चात दुपटीने वाढ झाली. त्यामुळे याचा विचार करून शासनाने हमीभाव जाहीर करावा अशी मागणी केली.
यावेळी प्रयोगाचे उद्घाटक चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ. सतीश वारजूकर, ओबीसी विभाग संघटक धनराज मुंगले, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद चौधरी, डॉ. मोहन जगनाडे, माजी अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना विनोदभाऊ बोरकर, माजी सभापती प्रफुलभाऊ खापर्डे, माझी जि प सदस्य खोजरामभाऊ मरसकोले, माजी नगरसेवक दिनेशभाऊ गावंडे, माजी सभापती पूनमताई वाघमारे, सरपंच हेमंत लांजेवार, संजयजी माकोडे, पुरुषोत्तमजी बगमारे, भूपेशजी कोरे, सरपंच रोशन वाघमारे, उपसरपंच रामकृष्णजी देशमुख, सरपंच कमलाकर ठवरे, संदीप कोरे, गजानन उरकुडे, मान्यवर मंडळी व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.

