मुंबई विद्यापीठ अभ्यास मंडळावर रोजगार हमी योजना विभागाचे सहाय्यक संचालक विजय कुमार कलवले यांची निवड

0
175

लातूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

हंडरगुळी- मुंबई विद्यापीठ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अभ्यास केंद्र या मंडळावर सदस्य म्हणून रोजगार हमी योजना विभाग मंत्रालयाचे सहाय्यक संचालक विजय कुमार कलवले यांची निवड केल्याचे पत्र प्राप्त झाले आहे .मुंबई विद्यापीठ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अभ्यास केंद्र अधिष्ठाता मंडळाची 2 ऑक्टोबर 23 रोजी बैठक घेण्यात आली होती या बैठकीत विचारविनिमय करून विजयकुमार कलवले यांची मंडळावर सदस्य म्हणून 2027 पर्यंत निवड करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. असे मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव प्राध्यापक सुनील भिरूड यांनी कळविले आहे.रोजगार हमी योजना विभागाचे सहाय्यक संचालक विजयकुमार कलवले यांना प्रशासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव असून त्यांचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अभ्यास केंद्र नावा रूपाला येईल असे वाटते. विजयकुमार कलवले यांचा प्रशासनाचा प्रवास हा उल्लेखनीय असून ते जिल्हा परिषद शिक्षक, विक्रीकर निरीक्षक, नायब तहसीलदार, सहाय्यक संचालक हा प्रवास केलेला आहे. ते सर्व पदे एमपीएससीच्या माध्यमातून काबीज केले असल्यामुळे त्यांना कामाचा अनुभव आणि जिद्द असल्यामुळे अभ्यास मंडळाला पुरेपूर गती देण्याचे काम केले जाईल असे दिसते. विजयकुमार कलवले प्रशासनात कामाच्या बाबतीत अग्रेसर व नवलौकिक मिळवलेले नावाजलेले आहेत. महाराष्ट्रात रोजगार हमी योजना हा विभाग जनमानसात दुर्लक्षित होता.पण विजय कुमार कलवले यांनी रोजगार हमी विभागाचा पदभार हाती घेतल्यानंतर हा विभाग नावा रूपाला व योजना थेट जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम उल्लेखनीय दिसून येते. त्यांच्या कामाचा पायंडा मुंबई विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अभ्यास केंद्राला नक्की होईल असे बोलले जाते मुंबई विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अभ्यास केंद्राच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल जळकोट तालुका काँग्रेस मागासवर्गीय विभाग तालुका अध्यक्ष संग्राम सिंदगीकर ,पत्रकार रोहिदास कलवले, नव्या दिशाचे संपादक राजीव किनीकर, बाबुराव आंबे गावे पत्रकार विठ्ठल पाटील, फारुख शेख, विश्वनाथ हांडे, विकास गायकवाड आदीने अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here