कोल्हापूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
कोल्हापूर- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचारांना अभिवादन करून एक वही – एक पेन हे अभियान आज हुपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर या ठिकाणी राबवण्यात आले.
ज्या महामानवाने आपल्या जीवनामध्ये सर्वात जास्त महत्त्व शिक्षणाला दिले, जर समाज शिकला तर आणि तरच हा देश खंबीरपणे उभा राहू शकतो अशी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण होती या अनुषंगाने आंबेडकरवादी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मान. सुहास हुपरीकर यांनी एक वही – एक पेन हे अभियान राबवून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन केले. विविध पक्ष संघटना मित्रमंडळी, सामाजिक कार्यकर्ते यांनी या उपक्रमास जास्तीत जास्त वह्या व पेन देऊन सहकार्य केले . यावेळी प्रांताधिकारी मौसमी चौगुले, हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे मॅडम व माजी नगराध्यक्षा जयश्री गाट यांच्या हस्ते पुतळा परिसरामध्ये विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. शिक्षणासाठी दिलेले हे योगदान हुपरी व हुपरी परिसरातील शोषित वंचित घटकातील, शिक्षणाची गरज असणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
यावेळी हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक कुंभार, दौलत पाटील, सुभाष कागले, मंगलराव माळगे, किरण कांबळे, किरण हुपरीकर, रफिक मुल्ला, पांडुरंग मानकापूरे, स्वप्निल हुपरीकर. इत्यादी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

