सिंदेवाहीत जागतिक दिव्यांग दिन साजरा

0
75

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

सिंदेवाही – अपंग (दिव्यांग) बहुउद्देशिय संस्था देलणवाडी कार्यालय सिंदेवाही द्वारा नुकतेच जागतिक दीव्यांग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष नितिन रामटेके तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव प्रदीप वढे, उपाध्यक्ष भरडकर ,कार्याध्यक्ष प्रियंका रासलमावार हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमा दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश मेश्राम यांनी केले. प्रास्ताविकातून दीव्यागांसाठी असणाऱ्या सरकारी योजना, नोकरीतील असणारे आरक्षण याविषयीची माहिती दिली. आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून सल्लामसलत उपदेशन करुन असणाऱ्या समस्याचे निवारण करण्यासाठी आपण या संस्थेला माहीत देऊन समस्या निकाली काढण्याचे प्रयत्न आपण करू असे आश्वासन उपस्थित सर्वांना दिले. संस्थेविषयी राबविण्यात येणाऱ्या योजना याची सविस्तर माहिती दिली. उपस्थित सर्वांना अल्पोहर देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कैलास मेश्राम सर यांनी केले तर आभार प्रदीप वढे उपस्थित सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाला सिंदेवाही व चिमूर येथील बहुसंख्य दीव्यांग सभासद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here