आमदार राणांची विधानमंडळात लक्षवेधी मान्य
अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती
अमरावती – गेल्या अनेक वर्षापासून महादेव कोळी समाजाला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देणाच्या मागणीचा विषय प्रलंबित असताना आ. रवि राणा यांनी या संबधी मांडलेली लक्षवेधी महसुल विभाग विधानसभा अध्यक्षाकडून मान्य झाली आहे. याच विषयाला अनुसरुन बैठक बोलावण्याच्या संबंधी मुख्यमंत्र्यांनी शासनास लेखी निर्देश दिले आहेत.
बैठकीला उपोषणकर्ते किंवा त्यांचे प्रतिनिधी व हेमंत पवार, उमेश ढोणे, संदीप बगाडे, विशाल बगाडे, संतोष घाटे, शिवचरण पेठे आदींची नावे पाठविले आहे. आ. रवि राणा यांच्या पत्र व्यवहार व पाठपुराव्याची ही फलश्रुती मानल्या जात आहे.

