ओबीसी नेते छगन भुजबळ 24 ला अमरावतीत

0
94

दसरा मैदानावर होणार आरक्षण बचाव एल्गार सभा…

अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती

अमरावती – महाराष्ट्रात सध्या आरक्षणाला घेऊन राजकारण खूपच तापलेला पाहायला मिळत आहे. एकीकडे २४ तारखेपर्यंत सरकारने आम्हाला आरक्षण न दिल्यास आम्ही सकल मराठा समाज एकवटून मुंबईत दाखल होऊ असे मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच म्हटले आहे. तर दुसरीकडे विद्यमान विधानसभा सदस्य तथा ओबीसी नेते छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणामध्ये मागच्या दाराने होणाऱ्या घुसखोरीला वाचवण्यासाठी सकल ओबीसी, भटके विमुक्त, बारा बलुतेदार नेते मंडळींच्या उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रभर सभा आयोजित केल्या आहेत. तर अमरावतीत होणाऱ्या दसरा मैदानावर सभा नियोजनाकरिता जिल्ह्यातील गावा-गावात जाऊन ओबीसी पदाधिकारी व कार्यकर्ते आरक्षण बचाव बैठका घेऊन ओबीसी आरक्षण बचाव प्रचार-प्रसार, जनजागृती तसेच दसरा मैदानावर होणाऱ्या सभेचे निमंत्रण देऊन उपस्थित राहण्याचे आवाहन करीत आहेत.

नुकतीच अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे आरक्षण बचाव एल्गार सभा बैठक घेण्यात आली. या बैठकीला विभागीय भारतीय पीछडा (ओबीसी) शोषित संघटन महाराष्ट्र अमरावती विभागीय अध्यक्ष प्रवीण पेटकर, समता परिषद जिल्हाध्यक्ष विपुल नाथे, वासुदेवराव चौधरी, एड. नंदेश अंबाडकर, समता परिषद महिला जिल्हाध्यक्ष कविताताई लांडे यांच्या उपस्थितीमध्ये सकल ओबीसी, भटके विमुक्त, बारा बलुतेदार पदाधिकारी व कार्यकर्ते यांना या ओबीसी बचाव एल्गार सभा आयोजन बैठकीत समाविष्ट करून येत्या २४ डिसेंबर रविवार रोजी सकाळी ११:०० वाजता अमरावती येथील दसरा मैदानावर होणाऱ्या या आरक्षण बचाव एल्गार सभेला ओबीसी नेते छगन
भुजबळ समवेत प्रकाशअण्णा शेंडगे, महादेवराव जानकर, खासदार रामदास तडस, गोपीचंद पडळकर, डॉ. बबनराव तायडे, ओबीसी मुस्लिम नेते शब्बीर अन्सारी, भटके विमुक्त नेते लक्ष्मण गायकवाड, बहुजन नेते दिलीपराव एडतकर व इतर नेते मंडळींच्या मार्गदर्शनात ही सभा होणार असल्याचे प्रसार माध्यमातून सांगण्यात आले.

तर ओबीसी आरक्षणावर आक्रमक होऊन ते धोक्यात आले आहे. राज्य शासनावर विविध प्रकारे दबाव टाकून धमक्या देऊन ओबीसी आरक्षणामध्ये मागच्या दाराने घुसखोरी करण्याचे सुनियोजित षडयंत्र सुरू आहे. त्यामुळे ओबीसींचे राजकीय अस्तित्व तसेच ओबीसींच्या लेकरा-बाळांचे शासकीय नोकऱ्यांमधील नोकऱ्या मिळण्याचे मार्ग बंद होणार आहेत आणि ओबीसी भटके विमुक्त जाती-जमाती व बहुजनांची नवी पिढी उध्वस्त होणार भटके विमुक्त आहे. त्यामुळे समाजाचे ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी मधील मागच्या दाराने नियमबाह्य होणारी घुसखोरी रोखण्यासाठी ओबीसी नेते तथा विद्यमान विधानसभा सदस्य छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनात मैदानावर ही आरक्षण बचाव दसरा एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाभरातील गावा-गावात जाऊन आम्ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते रात्रंदिवस एक करून जिल्ह्यातील ओबीसी, भटके विमुक्त, बारा बलुतेदारांना या एल्गार सभेसाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करीत आहोत असे या पार पडलेल्या बैठकी दरम्यान सांगण्यात आले.विधासभा सभागृहात म्हणतांना “मला गोळी मारली जावू शकते” या छगन भुजबळांच्या गौप्यस्फोटाने ओबीसी आरक्षणाला नवे राजकीय वळण लागले असून आता आरक्षणाला घेऊन महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या शिगेला जाणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here