मधुकरराव एकुर्केकर मित्रमंडळा तर्फे शिक्षकाचा सन्मान सोहळा संपन्न

0
107

बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज, लातूर
8788979819

उदगीर तालुक्यातील हेर येथील निर्मलपुरी महाविद्यालयत आदर्श शिक्षकाचा सन्मान सोहळा शनिवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता. या गुरूजनांचा शिक्षक सन्मान सोहळा २०२३-२४ उपक्रमाअंतर्गत निर्मलपुरी महाविद्यालय हेर येथील सर्व शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती सोपानराव ढगे, माजी सरपंच पंडितराव नानासाहेब ढगे. यांचाही सत्कार करण्यात आला असून त्याप्रसंगी संजय काळे भिम शक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष, बालाजी सोनकांबळे, बुध्दसंदेश कांबळे भिम शक्ती संघटना जिल्हा उपाध्यक्ष लातूर, प्रल्हाद सुवर्णकार, योगेश बिरादार आदी उपस्थित होते.
उदगीर व परिसरातील सन्माननीय गुरूजनांचा सन्मान करण्याचा निर्धार मित्रमंडळा तर्फे करण्यात आल्याची माहिती श्रीनिवास एकुर्केकर यांनी दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक्षक मटकेसर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here