जगन्नाथ महाराज मंदिर निर्माण भूमिपूजन संपन्न

0
51

जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ गवराळा उपक्रम

स्वप्निल मोहितकर
तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज, भद्रावती

भद्रावती-स्थानिक गवराला वॉर्ड भद्रावती येथे जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ च्या वतीने व परिसरातील सर्व दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून जगन्नाथ महाराज मंदिर निर्मिती सोहळा १६ तारखेला पार पडला.
सदर भूमिपूजन जेष्ठ दानशूर नागरिक श्यामराव नक्षीने यांचे हस्ते करण्यात आले.
तारीख सोळा हात जोडा हे ब्रीद बाळगून भक्तीतून सामाजिक संघटन व एकोपा राखण्याचा संकल्प यावेळी उपस्थित जगन्नाथ भक्तांनी केला.
याप्रसंगी मंडळाचे सर्व जेष्ठ मंडळीं वभजन मंडळींनी विषेश सहकार्य केले. भव्य घुगरी काला व भोजनदान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here