नूतन विद्यालयाचा श्रीराम भांगडीया जयंती निमित्त उपक्रम
सेलू प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
सेलू : येथील नूतन विद्यालयाच्या चित्रकला विभागाच्यावतीने श्रीरामजी भांगडीया जयंती निमित्त सोमवार (दि. १८) रोजी प्रशालेच्या प्रार्थना मैदानावर इयत्ता पहिली ते चौथीसाठी रंगभरन तर इयत्ता पाचवी ते दहावीसाठी चित्रकला स्पर्धा संपन्न झाली. हे स्पर्धेचे सोळावे वर्ष असून या रंगभरन- चित्रकला स्पर्धेत तिन्ही गटात शहरातील चारशे बाल चित्रकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
इयत्ता पाचवी ते सातवी या गटासाठी मी मित्रांसोबत पतंग उडविताना, माझे घर आणि माझा टॉमी, मित्र आणि मी बागेत फिरताना हे विषय तर आठवी ते दहावीसाठी माझा वाढदिवस, प्राणी संग्रहालयास भेट, भारतीय सैनिक एक प्रसंग हे विषय चित्र काढण्यासाठी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम. लोया, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर बाहेती, नूतन कन्या प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक रोहीदास मोगल, प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक किरण देशपांडे, देविदास सोन्नेकर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक चित्रकला विभागप्रमुख किशोर कटारे यांनी केले. सुत्रसंचलन सुरेश हिवाळे यांनी तर आभार प्रदर्शन फुलसिंग गावित यांनी केले. कांचन कोरडे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.स्पर्धा यशस्वीतेसाठी डॉ. काशिनाथ पल्लेवाड, अनंतकुमार विश्वंभर, केशव डहाळे, गोविंद अरूण रामपुरकर यांनी पुढाकार घेतला.

