कु. सोनाली कोसे
तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज, नागभिड
झाडीबोली साहित्य मंडळ साकोली व झाडीबोली साहित्य मंडळ बाम्हणी/खडकी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 16 डिसेंबर 2023 व 17 डिसेंबर 2023 दोन दिवसीय 31 वे भव्य दिव्य साहित्य संमेलन मौजा बाम्हणी/खडकी ता. सडक अर्जुनी जि. गोंदिया येथे जिल्हा परिषद शाळेच्या भव्य पटांगणावर भरगच्च लोकांच्या अफाट गर्दीत मोठ्या जल्लोषात पार पडले. त्यात लोककलेला वाव देण्यात आली. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुका अंतर्गत येणाऱ्या अडपल्ली चक या गावचे युवा कवी, लेखक मा. प्रभाकर देविदास दुर्गे यांचा देखील कविसंमेलनात सहभाग होता. त्यांनी आपली स्वरचित कविता “एकांत” सादर करून उपस्थित ज्येष्ठ व श्रेष्ठ मान्यवर, सर्व उपस्थित कवी, कवयित्री व जमलेल्या सर्व रसिक वर्गाची टाळ्यांची दाद मिळवत सर्वांची मने मोहून घेतली. त्यांचा साहित्यक्षेत्रातील प्रवास पाहून उपस्थित मान्यवर डॉ. हरिश्चंद्र बोरकर (अध्यक्ष झा. सा. मं. साकोली), स्वागताध्यक्ष विकास तु. खाटोले, कार्यध्यक्ष चंद्रकुमार बहेकार, समन्वयक नरेश भेंडारकर व या 31व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्काराबद्दल त्यांचे साहित्यिक सहकारी, मित्रपरिवार व नातेवाईकांनी प्रशंसा केली आहे.

