कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लाडबोरी येथे वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली.सर्वप्रथम गाडगे महाराज यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर समतादूत कृपाली धारणे यांनी गाडगे महाराज यांनी समाजाला कशाप्रकारे आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. देव दगडात नाही तर माणसात आहे हे विविध उदाहरणे देऊन त्यांनी समजून सांगितले. त्याचप्रमाणे कर्ज काढून कोणत्याही तीर्थक्षेत्राला जाऊ नये त्यामुळे आपल्या आर्थिक नुकसान होते आपल्याच गावी सर्व काही आहे आपले आई-वडीलच आपले दैवत आहे हे समजावून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन वनिता ठाकरे मॅडम व आभार राजश्री वसाके मॅडम यांनी मांनले. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक घनश्याम मांदाडे सर, जितेंद्र गुरनुले सर, जितेंद्र रहागडाले उपस्थित होते. तसेच सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

