बापरे लातुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क सुशोभीकरण करण्याची राजकीय पुढारी व अधिकारी यांना एलर्जी आहे का?- अक्षय धावरे
लक्ष्मण कांबळे
लातुर प्रतिनिधी
लातूर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क सुशोभीकरण व्हावे अशी लातूरकरांची इच्छा गेल्या 20 वर्षांपासून आहे असे निवेदने आंदोलने लातूरकरांनी कित्येक वेळा केले आहेत , भिम आर्मीच्या माध्यमातून ही वेळोवेळी आंदोलन करण्यात आले, गेल्या आंदोलनात तर भिम आर्मीने लातूर महानगरपालिकेला टाळा ठोको आंदोलन करण्यात आले होते . तरी आद्याप सुशोभीकरण झाले नाही किंवा कामाला सुरवात झाली नाही.
म्हणून आज दिनांक 22 डिसेंबर2023 रोजी लातूर शहर महानगरपालिका आयुक्त यांना पुन्हा स्मरणात यावे म्हणून निवेदन देण्यात आले या निवेदनात आठ दिवसाच्या आता सुशोभीकरणाला सुरवात झाली नाही तर भीम आर्मीच्या वतीने लातूर शहरांत महानगरपालिके च्या विरोधात भिक मांगो आंदोलन करु आणि जमा झालेला पैसा हा महानगरपालिकेला सुशोभीकारणासाठी देऊ, आसा इशारा मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिला.
यावेळी भिम आर्मीचे आक्रमक नेते महाराष्ट्र संघटक अक्षयजी धावारे, जिल्हाप्रमुख विलास आण्णा चक्रे, जिल्हासचिव बबलू शिंदे, जिल्हासंघटक बबलू गवळे, जिल्हासंघटक सोनू घोडके, लातूर तालुका अध्यक्ष बप्पा घनगावकर, तालुका सचिव हरीश सोनवणे, लातूर शहर अध्यक्ष संदिप कांबळे सह मोठ्या प्रमाणात भिम आर्मीचे पदाधीकारी हजर होते.

