ग्रामस्वराज्य दिनदर्शिका २०२४ चे विमोचन
सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर:-श्रीगुरूदेव सेवा मंडळ ऊर्जानगरच्या वतीने कर्मयोगी संत पुज्यनिय तुकारामदादा गीताचार्य यांची जयंती ही गीताजयंती म्हणुन साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीगुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगरचे सेवाधिकारी मा.शंकर दरेकर व प्रमुख वक्ते मा.मधुकर टिकले अड्याळ टेकडी,प्रमुख अतिथी राष्ट्रसंत साहित्य विचार परिषद केंद्रीय समितीचे उपाध्यक्ष विलास उगे, राजीराम भजनकर व महिला मंडळाच्या अध्यक्षा मुक्ता पोईनकर यांची उपस्थिती होती.
गीताचार्य हे अतिशय ध्येयवादी कामालाच राम मानत होते
“लोक धनवानांना पुसेना | लोक सत्तेला ओळखीना
परि सेवाधाऱ्याच्या चरणा | पुजू लागती जिवाने ||”
ही ग्रामगितेतील ओवी दादांना तंतोतंत लागू पडते.
त्यांचे थोरपण हे संतपदाचे आहे. ते कार्यकर्ता कसा असावा? याचे ज्वलंत जिवंत उदाहरण होते.त्याग, समर्पित भावना, आपुलकी, आचरण,आपले ध्येय हे सर्व त्यांच्याकडे होते.
राष्ट्रसंतांच्या कार्यात प पु तुकारामजी दादा हे हनुमंताचे कार्य करीत होते. त्याना वेगळ असे त्यांचे अस्तित्व नव्हते असे वर्णन मुख्य वक्ते मधुकर टिकले यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शंकर दरेकर सेवाधिकारी यांनी अध्यक्षीय भाषणात दादांच्या सहवासातील अनुभव व्यक्त केले व विस्तृत माहिती दिली.
राजीराम भजनकर व प्रशांत दुर्गे अध्यक्ष गुरूदेव सेवा मंडळ ऊर्जानगर यांनी दादांच्या कार्यावर विचार व्यक्त केले.
यावेळी कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य विचार प्रतिष्ठान नागपूर द्वारा निर्मित ग्रामस्वराज्य दिनदर्शिका २०२४ चे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल मेश्राम यांनी केले तर आभार रुपाली चहानकर यांनी मानले व शेवटी राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली असे देवराव कोंडेकर यांनी कळविले आहे.

