“हर-हर महादेव” च्या गजरात हाळी परिसरात पेटले गु-हाळांचे “बाॅयलर”

0
61

उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

हंडरगुळी- मागील कांही दिवसापासुन सहकारी, खाजगी साखर कारखाण्यांचे “बाॅयलर” पेटले असुन, अनेक शेतकरी कारखाण्यांना ऊस देताना तर कांहीजण घरच्याघरी गाळप करताना दिसतात.आणि म्हणुन हाळी व परिसरात घरगुती गु-हाळे जागोजागी सुरु झाले असुन, ऊस रसाची कलई भरलेली उचलताना “हर-हर महादेव” असा गजर कानावर पडत आहे.तसेच एका आदनात 22 ते 23 गुळडाग बनतात. अशी माहिती प्रगतिशील शेतकरी श्री शहाजी बापुसाहेब पाटील यांनी दिली हंडरगुळीचा तिरु म.प्रकल्प हा म्हंजे शेतकर्र्यांसाठी वरदान असुन,याच प्रकल्पातील पाण्यामुळे हंडरगुळी व परिसर “ग्रीनबेल्ट” म्हणुन ओळखला जात असुन,सध्या पाणी “प्राॅब्लेम” असल्याने ऊसाची लागवड कमी होऊ शकते.अशी ही चर्चा ऐकू येते.. दरम्यान खाजगी गु-हाळांचे “बाॅयलर’ पेटल्याने हाळी शेतशिवारात “हर हर महादेव” हा गजर ऐकू येत आहे….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here