कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
शिवनी वनपरिक्षेत्रअंतर्गत सिरकाडा येथील गावाशेजारील जंगलात देवकाबाई कोडापे यांची गाय वाघाने हल्ला करून ठार केली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. यापूर्वी काही दिवसांअगोदर देवकाबाई कोडापे यांच्याच गावातील गोठ्यात वाघाने येऊन त्यांचा गोरा ठार केला होता.वाघाने गाय ठार केल्यामुळे देवकाबाई कोडापे यांच्यावर संकट कोसळले आहे. सिरकाडा हे गाव घनदाट जंगलाला लागून असल्यामुळे गावाच्या सभोवताल वाघ,हिस्त्र प्राणी येत असतात, सिरकाड़ा येथे गेल्या काही दिवसांपासून गावाच्या परिसरात वाघ वावरत आहे. गावाशेजारी वावरणाऱ्या वाघाच्या दहशतीमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक़ानी केली आहे.
घटनेचा पंचनामा शिवनीचे क्षेत्र सहायक एस. एम. प्रधान व वनरक्षक एस. जी. चहांदे यांनी केले.

