कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाही तालुक्यातील मिनघरी येथे जोशाबा युवा संघटना व सावता माळी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव निमित्त मिनघरी गावामध्ये दिनांक १ जानेवारी २०२४ पासून ते ३ जानेवारी २०२४ पर्यंत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये दिनांक १ जानेवारीला कबड्डी स्पर्धा, दौड स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, २ जानेवारीला भव्य जिल्हास्तरीय एकल व समूह नृत्य स्पर्धा आयोजन करण्यात आली आहे. यामध्ये समुह नृत्याचे प्रथम पारितोषिक 15 हजार रुपये रोख, द्वितीय पारितोषिक 10 हजार रुपये रोख व तृतीय पारितोषिक 7 हजार रुपये रोख तसेच एकल नृत्याचे प्रथम पारितोषिक 7 हजार रुपये रोख, द्वितीय पारितोषिक 5 हजार रुपये रोख व तृतीय पारितोषिक 3 हजार रुपये रोख असे बक्षिसाचे स्वरूप आहे.
आणि 3 जानेवारीला दुपारी अकरा वाजता भव्य रक्तदान शिबिर, तीन वाजता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रॅली तसेच रात्रौ आठ वाजता प्रबोधनात्मक सप्त खंजिरी वादक इंजिनीयर पवन दवंडे महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आलेले आहे. तरी संपूर्ण जनतेने या कार्यक्रमाचा भाग घेऊन आस्वाद घ्यावा असे मंडळाने विनंती केली आहे.

