सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
मृत बालकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी उलगुलान संघटनेच्या वतीने राजू झोडे यांच्या नेतृत्वाखाली दुर्गापुरातील वेकोलीच्या कार्यालयासमोर अधिकाऱ्यांना घेराव करून ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.7 नोव्हेंबर ला दुर्गापूर वेकोलीच्या खुल्या टाक्यात बुडून प्रेम वाघमारे या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.त्यानंतर वेकोलीच्या कार्यालयाला घेराव घालत आर्थिक मदत देण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली होती.त्यानंतर वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी मागणी मान्य केली मात्र अजूनही आर्थिक मदत देण्यात आली नाही.तयामुळे मृतकाच्या कुटुंबियांना 25 लाखाची आर्थिक मदत देण्याची मागणी करत शनिवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
वेकोलीच्या दुर्लक्षामुळे एका निष्पाप मुलाचा जीव गेला असताना सुद्धा वेकोलीच्या अधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने राजू झोडे यांनी मृत मुलाच्या कुटुंबियांना सोबत घेऊन वेकोली अधिकाऱ्यांना धारेवर धरले.दरम्यान आंदोलन चिघळत असल्याचे बघून पोलीस प्रशासनाला पाचारण करण्यात आले.मात्र तरी सुद्धा ठिय्या आंदोलन सुरूच होते.दरम्यान वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी 25 लाखांची आर्थिक मदत तात्काळ देण्याचे मान्य केले.त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी निशा वाघमारे, शंकर वाघमारे,सचिन मांदाऴे , शैलेश सोनटक्के,पंकज वाघमारे,गुरु भगत,सुघ्दा रायपूरे,गिताबाई सोनटके कविता मेश्राम आदि गांवकरी उपस्थित होते.

