प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
आंबेडकरवादी सेना कोल्हापूर यांच्या वतीने आज रविवार दिनांक ३१/१२/२०२३ रोजी शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस) कोल्हापूर या ठिकाणी आढावा बैठक तसेच कोल्हापूर जिल्हा पद नियुक्ती सोहळा आयोजित केला होता.
यावेळी आंबेडकरवादी सेनेच्या वतीने आगामी काळात पार पडणार्या लोकसभा, विधानसभा तसेच महानगर, नगरपालिका निवडणूक संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करेल.
तसेच यापुढील काळात आंबेडकरवादी सेना सर्वच जातीधर्माच्या न्याय हक्का बरोबर कामगारांचे प्रलंबित प्रश्न आणि विद्यार्थी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असेल असे प्रतिपादन आंबेडकरवादी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.सुहास हुपरीकर यांनी केले.
दरम्यान कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी आघाडी पदी मा. समीर कोळेकर, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी पदी निशा कांबळे, जिल्हा महासचिव पदी सुमैय्या पत्रेवाले, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षा शाहीन बारगीर, आघाडी युवा जिल्हा अध्यक्ष पदी मा.प्रविण बनसोडे, कोल्हापूर जिल्हा महासचिव पदी मा.सुहेल शेख, कोल्हापूर जिल्हा सचिव पदी मा.आय्याज मुजावर,शाहूवाडी तालुका अध्यक्ष विद्यार्थी आघाडी पदी मा.राहिल अत्तार, कोल्हापूर शहर अध्यक्ष पदी मा. रियाज तांबोळी यांची नियुक्ती करण्यात आली.
या सर्व नियुक्त्या आंबेडकरवादी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मा.बबनराव कानडे, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते प्रा.शाहीद शेख, महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.गणेश कांबळे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.सचिन आडसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.
यावेळी १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिना दिवशी आंबेडकरवादी सेनेच्या पहील्या वर्धापनदिनानिमित्त वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे आंबेडकरवादी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.सुहास हुपरीकर यांनी सांगितले.
तसेच लवकरच आंबेडकरवादी सेनेच्या वतीने राज्यव्यापी अधिवेशन भरवण्यात येणार असल्याचे आंबेडकरवादी सेनेचे कार्याध्यक्ष मा.बबनराव कावडे आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते मा.शाहीद शेख यांनी सांगितले.
संघटनेच्या माध्यमातून यापुढे महिला सक्षमीकरण, बेरोजगारांसाठी व्यवसायासाठी आवश्यक योजनांचा लाभ तसेच शोषित वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी यापुढे सर्वधर्मसमभाव ही संकल्पना आत्मसात करून भविष्यात वाटचाल करण्यात येणार आहे.
शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच शहराच्या विकासासाठी आंबेडकरवादी सेना मोर्चे आंदोलने माध्यमातून रस्त्यावर उतरणार असल्याचे मा.बबनराव कानडे यांनी सांगितले.
यावेळी आंबेडकरवादी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.सुहास हुपरीकर, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मा.बबनराव कानडे, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते प्रा.शाहीद शेख, महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.गणेश कांबळे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.सचिन आडसुळे, डॉ सलीम शेख,सुहेल शेख, निशा कांबळे, प्रविण बनसोडे, संग्राम कांबळे, रियाज तांबोळी, विशाल कांबळे, सुमैय्या पत्रेवाली, शाहीन बारगीर, समीर कोळेकर, राजमहमंद अत्तार, युसुफ हुसेनमिया, शोएब जमादार, अमन शेख, साहिल पाटील, प्रकाश मचले, यश गाडे, आदित्य धनवजीर, रोहीत क्षिरसागर, साहिल जमादार, आफरिन गवळी, प्रशांत कांबळे, उषा गणेशाचार्य, शैला लोंढे, वीना घाडगे, सुनयना बनसोडे आदी पदाधिकारी मान्यवर तसेच युवा तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

