राज्यस्तरीय युवा महोत्सवात लातूर विभागाने मारली बाजी

0
74

बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज लातूर

राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने उदगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात लातूरने चांगलीच बाजी मारली आहे. लातूर बरोबर कोल्हापूरनेही आपली चमक दाखवली आहे. लातूर विभागाने तब्बल आठ पारितोषिके वितरणाचा कार्यक्रम क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, जीवन गौरव पुरस्कार विजेते उदय देशपांडे, तहसीलदार रामेश्वर गोरे, पुरस्कार विजेते विजय सोमाणी, माधव बावगे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी पार पडला. प्रस्ताविक सहसंचालक सुधीर मोरे यांनी केले .प्रास्ताविकात त्यांनी हा युवा महोत्सव राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री व या भागाचे नेतृत्व करणारे संजय बनसोडे यांच्या सूचनेनुसार उदगीर येथे पार पडला असल्याचे सांगून हा युवा महोत्सव नव्या उंचीवर पोहचला असल्याचे सांगितले.
या युवा महोत्सवातील विजेते
वैयक्तिक लोकगीत-प्रथम – पृथ्वीराज माळी (कोल्हापूर), द्वितीय टीम झेनीत इंडिया फौंडेशन (अमरावती), तृतीय अपेक्षा डाके(लातूर), समूह लोकगीत -प्रथम -कलाधिराज सांस्कृतिक कला संघ (लातूर), द्वितीय-शारदा संगीत विद्यालय बारामती, तृतीय -पालघर, समूह लोकनृत्य -प्रथम अ. भा. नाट्य परिषद धाराशिव लातूर विभाग), द्वितीय-नटराज कला मंच मुंबई, तृतीय-महात्मा गांधी महा. सावली, वैयक्तिक लोकनृत्य -प्रथम धनिष्ठा काटकर (कोल्हापूर), द्वितीय -अदिती केंद्रे (लातूर), तृतीय -रोहित शर्मा (मुंबई), फोटोग्राफी–प्रथम ऋतुजा मुन (नागपूर), द्वितीय-प्रकाश पाटील, तृतीय -सागर साठे(नासिक), कथालेखन – प्रथम-शिवप्रसाद भोळे नांदेड-लातूर विभाग)शुभम जाधव(धुळे) तृतीय -आदित्य भांगे नांदेड-लातूर विभाग), पोस्टर -प्रथम -पियुष काकडे(अमरावती), द्वितीय -कुणाल जाधव (नासिक), तृतीय-समीक्षा वाघ(कोल्हापूर), वक्तृत्व-हिंदी,इंग्रजी -प्रथम -श्रुती तायडे (अमरावती), द्वितीय -श्रेया म्हापसेकर (कोल्हापूर), तृतीय -सलोनी जैन (नासिक), रांगोळी- प्रथम -करण वटार (मुंबई), द्वितीय -भरत नांदरे (कोल्हापूर), तृतीय -हनुमंत पांचाळ, आकांक्षा दांगडे (लातूर), पथनाट्य–प्रथम – नेताजी सुभाषचंद्र बोस महा. (नांदेड -लातूर विभाग) द्वितीय – शिवछत्रपती महा. (छत्रपती संभाजीनगर) तृतीय -मोहिते पाटील लॉ. कॉलेज (खेड) एकांकिका -प्रथम – कान्हा ललित कला केंद्र (जळगाव), द्वितीय-चांगा ठाकूर महा. (पनवेल), तृतीय – के,बी, पी, विद्यापीठ (सातारा), पाककला — प्रथम –ऋतुजा घाटगे (पुणे), समीधा राऊत (कोल्हापूर), तृतीय –जान्हवी महाजन (नासिक), प्रदर्शन –प्रथम – प्रणिती शेळके, रविना नागपुरे, निषाद रोंघे, मयूर गायकवाड(अमरावती), द्वितीय–शुभांगी जावळे (लातूर), तृतीय-दिव्यानी सुळके, गायत्री कुमावत ,हर्षदा अहिरे, हर्षदा पगार, रितू अहिरे, कावेरी अहिरे (नासिक),वस्त्रोद्योग –प्रथम – अनुसया वाकळे, रोहित वाघमारे, नितीन उबाळे, शीतल दुधवे (छत्रपती संभाजीनगर), द्वितीय-रमेश गायकवाड(लातूर), तृतीय -त्रिगुण पुजारी (कोल्हापूर), हस्तकला – प्रथम – साने गुरुजी विद्या. (केज), द्वितीय-सई साळोखे, माहेश्वरी भोसले(कोल्हापूर), तृतीय -प्रणव मुळे, ऍग्रो प्रोडक्ट-प्रथम -आनंद हिवरे (नासिक), द्वितीय- शिवम मोद्रेवार (कोल्हापूर), तृतीय -गौरी रानडे, वर्षा जाधव वैभवी उपाध्याय, पूनम माळटे, पूनम वाघमारे (अमरावती). या कार्यक्रमात ४९ परीक्षकांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन आभार प्रदर्शन निवेदिका प्रा. शोभा कुलकर्णी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here