अनैशा वाहन चालक संघटना ची मागणी
चंद्रपूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर – दि- 30/12/2023 (Hit & Run) मारून पळणे, ठोकून पळणे हा काळा कायदा रद्द करण्यात यावे.
सन्माननीय गृहमंत्री यांनी संसदेच्या मा.लोकसभा या सदनामध्ये (Hit & Run) अचानक झालेल्या अपघाताला जबाबदार असलेला व्यक्ती हा अपघात ग्रस्त व्यक्ती ला किवा पोलीस स्टेशन पर्यंत 1 न पोहोचविल्यास 10 वर्ष कारावास असा प्रस्ताव पारित करण्यात आला वाहन चालक बांधव देशाच्या अर्थव्यवसेवा कणा आहे. त्यामुळे वाहन चालक देश चालवितो असे म्हटल्या जाते परंतु यावरील पारित केलेल्या कायदयामुळे देशाची अर्थव्यवस्थाा ढसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या कायदयामुळे देशातील वाहन चालक बांधवाचे खूप जास्तपरिवार उदवस्त होण्याची शक्यता आहे आपघाताला जबाबदार हा वाहन चालक बांधव असतो असे नाही. कारण आम्ही जाणून बुजून केलेला तो आपराध नाही.
वाहण चालकार हा काळा कायदा वाटत आहे. वरील सर्व कारणे लक्षात घेता हा काळा कायदा रद्द करण्यात यावा. आणि आपण हा काळा कायदा रद्द कराल अशी आशा बाळगतो असे केल्यास देशातील सर्व वाहन चालक बाघव है सदैव आपले ऋणादायी राहील.
अन्यथा आम्ही सर्व गाडी चालक बांधव हे आंदोलने, प्रदर्शने किवा स्टेरिंग छोडो आंदोलन करण्यात येईल आणि या आंदोलना दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्व जवाबदारी हि शासन प्रशासनाची राहील.
अनैशा वाहन चालक संघटना संस्थापक अध्यक्ष सुरज उपरे यांनी दि. 30/12/2023 रोजी मा पंतपधान मा. गृहमंत्री, मा. परिवाहण मत्री, मा. जिल्हाधिकारी, चद्रपुर यांना निवेदन देण्यात आले.

