
उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
उदगीर- हंडरगुळी ग्रामिण गावखेड्याच्या विकासाकरीता शासन स्तरावरची पंचायत राज व्यवस्था ही गत 2 वर्षापासुन गायब असल्यामुळे पं.स.व जि.प.मध्ये अधिका-यांचे राज बघावयास मिळते.परिणामी हाळी ता.उदगीर भागातील सुकणी, मोरतळवाडी,रुद्रवाडी,चिमाचीवाडी आदी गावात विकास कामांचा पुरता बोजवारा उडाला असुन हाळी भागात विविध प्रकारच्या “खंडीभर” समस्या दिसुन येतात.तर स्थानिक स्वराज संस्थेत अधिकारी ऐवजी पदाधिकारी राज येणे गरजेचे आहे.अशी चर्चा हाळीसह वरील गावात होत असली तरी ही सरपंच विजयकुमार अंबेकर , उपसरपंच बालाजी भोसले पाटील व ग्राविअ.कांबळे एस.आर ही “ञीमुर्ती” माञ पं.स.जि.प.ते मंञालयातुन गत तीन वर्षात विविध कामे आणताना व गल्लीबोळात विकास कामे करताना हंडरगुळीकरांना दिसते.तेंव्हा अशी धमक अन्य गावच्या “ञिमुर्ती” मध्ये नाही का?असा सुर ऐकू येत आहे.. .. ग्रामीण गावखेड्यातील पंचायत राज व्यवस्थेत “ञिसुञी” ला विशेष असे महत्व आहे.ग्रामीण भागाच्या विकास कामासाठी मधळ्याकाळात 73 वी. घटना दुरुस्ती करुन पंचायत राज व्यवस्था बळकट करायचा प्रयत्न केला.पण गत 2 वर्षापासुन पंचायत राज व्यवस्थेतील ञिसुञीला दोन स्तरावर फक्त पदाधिकारी राज नाही. म्हणुन ग्रामीण भागातील विकासाला ब-याच अंशी ब्रेक लागल्याचे हाळी व सुकणी,मोरतळवाडी,चिमाचीवाडी, रुद्रवाडी आदी ठिकाणच्या”खंडीभर” समस्या बघून बोलले जाते.तर विविध अशा मुलभुत,पायाभुत समस्या कशा सोडायच्या अण् विकास कामांची “बुलेट ट्रेन” गावात कशी आणायची. याचा अनुभव हंडरगुळी ग्रा.पं.मधील सरपंचाच्या माध्यमातुन गावभर होत असलेल्या “धडाकेबाज” विकास कामांकडे बघुन अन्य ग्रा.पं.मधील पदाधिकार्र्यांनी अनुभव घ्यावा.अशी चर्चा सन.1985 ते 2000 पर्यंत व्हायची तशीच चर्चा आता ही हंडरगुळीतील विकास कामांकडे बघुन हाळी व परिसरातील जनतेतुन होत आहे.गत दोन वर्षापासुन पं.स.व जि.प.मध्ये प्रशासक असल्याने लोक प्रतिनिधी ऐवजी प्रशासक अधिकारी राज असल्याने पंचायत राज व्यवस्थे मधील”ञिसुञी”ला विशेष महत्व असते.माञ अधिकारी राज असलेने अनेक गावात विकास कामांसह अन्य “खंडीभर” समस्या पसरल्याचे चिञ वरील गावात दिसते.तर अधिकारी राज असलेतरी पण सरपंच अंबेकर, उपसरपंच बालाजी भोसले पाटील व ग्राविअ.कांबळे एस.आर.ही “ञिमुर्ती” पं.स.जि.प. ते मंञालयातील विविध विभागाच्या विकासाच्या “ढिगभर” योजना गत तीन वर्षापासुन हंडरगुळी गावात राबवताना दिसतात.असे असलेतरी ही स्थानिक स्वराज संस्था जि.प.व पं.स.यांच्या निवडणुका होणे गरजेचे आहे. अशी चर्चा जनतेत आहे.














