“रन फॉर महाराष्ट्र” २०२४ मॅराथॉन स्पर्धेचे अयोजन

0
107

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती तर्फे रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ ला स्पर्धेचे आयोजन

स्वप्निल मोहितकर
तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज भद्रावती

भद्रावती :-भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती हे नाव शिक्षण, संशोधन, किडा आणि सामाजिक क्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाने अर्धशतकापासून सुपरिचित आहे, उपरोक्त क्षेत्रात संस्था दरवर्षी अनेकविध कार्यकमाचे आयोजन करीत असते भद्रावतीकरांच्या सुधृढ आरोग्याच्या व राष्ट्र निर्मितीच्या उ‌द्देशाने भद्रावती शिक्षण संस्था मागील काही वर्षापासून मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करीत असते. मागील वर्षात “रन फॉर युनीटी”, “रन फॉर डॉटर” व “रन फॉर फेंडशिपचे” आयोजन संस्थेद्वारे केले आहे व भद्रावती परिसरातील नागरीकांकडून तिन्ही स्पर्धांना उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीने रविवार दिनांक ७ जानेवारी, २०२४ ला सकाळी ७ ते १०.३० दरम्यान “रन फॉर महाराष्ट्र” या बिरुदाने मॅराथॉन स्पर्धा २०२४ चे अयोजन केले आहे हि स्पर्धा यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरवात होवून गवराळा गेट व परत अशी राहणार आहे.

या मॅराथॉन स्पर्धेला मान नाओमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा हया हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेची सुरवात करणार आहेत, या मॅराथॉन स्पर्धेला भद्रावतीतील नागरीक, शाळा, महाविद्यालये, मंडळे यांना प्राचारण करण्यात आले आहे. आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीकरीता व उत्तम आरोग्याकरीता लहानापासुन तर थोरांपर्यंत महाराष्ट्रीयन वेषभुषेत सर्वांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन भद्रावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मान डॉ विवेक नि. शिंदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here