एन. जी. जी. इंग्लिश स्कूल नागभिड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिन संपन्न

0
86

कु. सोनाली कोसे
नागभिड तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज

एन. जी. जी. इंग्लिश स्कूल नागभिड येथे भारतातील पहिली शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिन संपन्न झाला. संत महापुरुषांची ओळख आणि त्याचे योगदान हे विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने स्कूलचे प्राचार्य डार्विनकोब्रा याचे अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलित केले. प्रमुख पाहुणे म्हणून पुजा पांडव व कविता गोन्नाडे उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डार्विनकोब्रा भाषणात म्हणतात मुलींसाठी पहिली शाळा उघडून शिक्षणाची कवाडं खुली करणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती संपूर्ण भारतात साजरी केली जाते आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान, त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. महिला सशक्तीकरणाकरिता त्यांनी आपल संपूर्ण जीवन समर्पित केलं आहे. 1848 साली स्त्रिया व अस्पृश्य यांना शिक्षण देणे हा गुन्हा होता. हे कार्य करत असताना वेळप्रसंगी समाजाची निंदा व अवहेलना सुद्धा त्यांनी सहन केली. वेळोवेळी अपमानित केले गेले. समाजाची होणारी टीका सहन करत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी मुलींची पहिली शाळा भिडे यांच्या वाड्यात काढून देशभरात अनेक शाळा काढल्या. याच्यांच फलश्रुतीमुळे आजची महिला मोठमोठ्या उच्च पदावर कार्यरत आहेत हि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले याची देन आहे असे यावेळी म्हणाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन वनश्री ठेंगरी तर आभार मंगला शेंन्डे यांनी केले. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षकानी विनम्र अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here