prabodhini news logo
Home चंद्रपूर तलाठी भरती गुणवत्ता यादी तात्काळ रद्द करून सखोल चौकशी व्हावी- रोहित जंगमवार,...

तलाठी भरती गुणवत्ता यादी तात्काळ रद्द करून सखोल चौकशी व्हावी- रोहित जंगमवार, स्पर्धा परिक्षा शिक्षक

0
186

सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज

बल्लारपूर- दि.7/01/2024 नुकतेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील तलाठी व वनरक्षक भरतीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या गुणवत्ता यादीत खुप मोठा गैरप्रकार झाल्याचे आरोप स्पर्धा परिक्षा शिक्षक व आपचे शहर संगठनमंत्री रोहित जंगमवार यांनी केले आहे. तलाठीच्या गुणवत्ता यादीत ज्या मुलीचा जिल्ह्यातून पहिला क्रमांक आहे तीला 200 पैकी 214 गुण आहेत. परंतु त्याच मुलीला वनरक्षक भरती परिक्षेत 120 पैकी फक्त 54 गुण मिळाले. या दोन्ही परिक्षा 15 दिवसांच्या अवधीत झाले असतांना एका परिक्षे इतके कमी गुण मिळवणारी मुलगी दुसऱ्या परिक्षेत अख्ख्या जिल्ह्यातून प्रथम कशी येऊ शकते, असा प्रश्न स्पर्धा परिक्षा विद्यार्थी उपस्थित करित आहेत. हा निकाल दोषपूर्ण असल्याने हा निकाल असाच घोषित न करता ज्या विद्यार्थ्यांना तलाठी भरतीत 200 पैकी 175 च्या वर गुण आहेत त्यांची मुलाखत घेऊन त्यांची क्षमता तपासावी व या मुलाखतींची विडियोग्राफी केली जावी अशी मागणी रोहित जंगमवार यांनी केली. यावेळेस भुवन डेरकर, सुरज निट्टूर, सौरभ चौहान, अनिल पाल प्रज्योत मसराम, कोमल खंडवायी, हे स्पर्धा परिक्षा विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here