आरक्षणाची मर्यादा वाढवा; दिल्लीत आरक्षणासाठी मराठा-जाट-गुज्जर-पाटीदार व इतर बैठक संपन्न संघर्ष राष्ट्रीय समितीची बांधणी

0
206

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

नवी दिल्ली : अखिल भारतीय स्तरावर मराठा जाट गुज्जर पाटीदार व इतर समाजाची संयुक्त बैठक १२जानेवारी २०२४रोजी सकाळी महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथील भव्य सभागृहात पार पडली आणि आरक्षणाची मर्यादा वाढवा व तशी घटना दुरुस्ती केंद्र शासनाने करून सर्व वर्गांना न्याय देऊन आरक्षणाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठा-जाट -गुज्जर-पाटीदार व इतर समाजाला न्याय मिळवुन देण्यासाठी सदरची बैठक संपन्न होऊन राष्ट्रीय स्तरावर आरक्षणाच्या प्रतीक्षेत असेलल्या सर्वच समाजाची संघर्ष समिती मोर्चाची बांधणी करून समन्वय केला जाईल अशी घोषणा या महत्व पूर्ण बैठकीत करण्यात आली.प्रमुख वर्ग एकत्र येत आरक्षणा साठी संयुक्त आरक्षण संघर्ष समिती मोर्चाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठा आणि जाट व इतर समूहाच्या आरक्षणाचा भविष्यातील लढा या निर्णायक बाबी वरील धोरण ठरविण्याच्या महत्वाच्या बैठकीस उपस्थित मान्यवर ज्यात दिलिपसिंहदादा जगताप,चौधरी राकेश टिकेत, युद्धवीर सिंह चौधरी, हिंमतसिंह गुर्जर, मनोज पनारा, रामलाल मिल, संभाजीराजे दहातोंडे, संतोष नानावटे या सह सुरेश द्रविड,परविंदर सिंह अवाना, सुभाष चौधरी, राजेशनिंबाळकर, दिलीप धनधरे, राम मुळे, अमोल वाकुडकर या सह देश भरातून अनेक समाजाचे प्रतिनिधी उपस्थीत होते.
या समितीत आरक्षणाचे अभ्यासक, घटनातज्ञ,पूर्व न्यायाधीश,विवीध संघटनेचे प्रतिनीधींचा सामावेश होणार आहे.

आमच्या विशेष प्रतिनिधीने या बाबत सखोल माहिती प्राप्त करून घेतली असता असे लक्षात आले की,महाराष्ट्रा तील पुणे येथे अखिल भारतीय मराठा महासंघाने पदाधिकऱ्यां साठी आरक्षणा बाबत कायदेशीर आणि घटनात्मक तरतुदी नक्की काय आहेत हे जाणुन घेण्याचा निर्णय घेतला होता त्या साठी एक दिवसीय महत्वपूर्ण अशा कार्यशाळेचे आयोजन आरक्षणा चे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांचे मार्गदर्शना खाली केले होते आणि त्यात भारतीय राज्य घटना व त्यातील तरतुदी यावर दिवसभर दोन सत्रात पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन व्दारे आयोजीत या कार्यशाळेत आरक्षणाची मर्यादा वाढविल्या शिवाय देशभरातील मराठा, जाट, पाटीदार, गुज्जर, मुस्लीम व इतर न्यायाच्या प्रतिक्षेत असेलल्या तत्सम वर्गाला न्याय मिळू शकणार नाही ही कायदेशीर व घटनात्मक बाब जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी आपल्या अभ्यासु पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन व्दारे उपस्थितांच्या लक्षात आणुन दिली होती.
त्या अनुषंगाने आरक्षणाची मर्यादा वाढवून घटना दुरूस्ती करावी या मागणी राष्ट्रीय स्तरावर रेटल्या शिवाय आरक्षणाच्या मर्यादेत वाढ होणार नाही व त्यासाठी घटना दुरुस्ती करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले होते.त्या अनुषंगाने दिल्लीत अखिल भारतीय मराठा महासंघाने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपसिंह दादा जगताप यांचे नेतृत्वात जंतर मंतर नवी दिल्लीत घेतले होते. तदनंतर त्यास पूरक असे आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची मागणी करण्यासाठी जाट मराठा यांचे संयुक्त अधिवेशन दिल्ली येथे तालकटोरा स्टेडियम येथे संपन्न झाले होते व त्यातच ठरले होते की उर्वरीत सर्व समाजाची आरक्षणाची मर्यादा वाढविण्या साठी व घटना दुरुस्तीची मागणी करण्या साठी सर्व समाजाची संयुक्त बैठक घेउन राष्ट्रीय समन्वय समिती स्थापन करावयाची.
त्या प्रसंगी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपसिंह जगताप यांनी सांगितले की,आज शेतकरी असलेल्या मराठा व जाट आणि इतर अनेक समुहा च्या भावी पिढ्यांचे भवितव्य आरक्षण नसल्यामुळे अनिश्चित आहे.या साठी शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांत आम्हाला आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे झाले आहे. लोकशाही व्यवस्थेत जाटआणि मराठा व इतर समाजाचे आत्मबल निर्भयता आणि एकता हेच शस्त्र आहे.या ताकदीवर आपण आरक्षण प्राप्त करून घेऊ शकतो असे ते म्हणाले. मागील मेळाव्यात व उपोषणात जाट मराठा समाजातील अनेक मंत्री व खासदार या संमेलनाला नवी दिल्ली येथील ताल कटोरा स्टेडियम येथे उपस्थीत होते.
१२ जानेवारी रोजी पार पडलेल्या या बैठकी मुळे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांची दोन दशकाची कायदेशीर व घटनात्मक मागणीच न्याय मिळवुन देऊ शकते हे परत एकदा राष्ट्रीय स्तरावर सिद्ध झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here