सिंदेवाही शहरात कुत्रीने चार जणांना चावा घेतल्याने, कुत्रीला गमवावा लागला जीव

0
82

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही

सिंदेवाही नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या लक्ष्मीनगर कुत्रीने चावा घेतल्याने काही काळासाठी दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. सविस्तर वृत्त असे की सिंदेवाही नगरपंचायत अंर्तगत येत असलेल्या प्रभाग दोन मधील लक्ष्मीनगर येथे सकाळी आठ वाजता च्या सुमारास कुत्रीने आळीपाळीने चार जणांना चावा घेतला. त्यामुळे या परिसरात काही काळासाठी दहशत निर्माण झाली होती. लक्ष्मीनगर येथे कुत्रीने एक महीन्याअगोदर पिल्लांना जन्म दिला होता तेव्हा पासून ती या परीसरात तीचे वास्तव्य होते. अचानक सकाळी आठ वाजताच्या सुमारास कुत्रीने या परीसरातील चार व्यक्तीला चावा घेतला असुन त्यामध्ये दोन महिला, मुलाचा व एका वयोवृद्ध व्यक्तीचा समावेश आहे त्याना तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले.
सदर घटनेची माहिती मिळताच नगरपंचायत कर्मचारी यांनी कुत्रीचा बंदोबस्त करण्यासाठी आले.या परिसरात लोकांच्या गर्दी मुळे कुत्री सैरावैरा पळत सुटली त्यामुळे पुन्हा किती लोकांना चावणार या भितीमुळे कुत्रीला आपला जीव गमवावा लागला आहे. कुञीला जीवानिशी मारल्याने अनेक प्राणी मित्रांनी नाराजी व्यक्त केली तर काहीनी कुत्रीला ठार मारल्याने समाधान व्यक्त केले, परंतु यामुळे एक महीन्यापुर्वी जन्माला आलेल्या पिलांचे आयुष्याचे काय होणार हा प्राणीमित्रांना प्रश्न पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here