नविन बसस्थानक परिसरात केली साफसफाई तर जुन्या स्थानकातील अतिक्रमणाचे काय ? अतिक्रमणास आर्शिवाद कुणाचा ?

0
57

उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

उदगीर तालुक्यातील हाळी- हंडरगुळी येथे असलेल्या एसटी बस स्थानक परिसराची दुरावस्था झाली होती.व याची सचिञ बातमी याच पेपरातुन प्रकाशित करुन संबंधितांचे लक्ष वेधले होते. तेंव्हा कुठे परवा हळी येथील बस स्थानक परिसरातील झाडी,झुडपे व अन्य घाण काढुन हा परिसर स्वच्छ व टाॅपटीप केल्यामुळे प्रवाशी जनतेतून समाधान व्यक्त केले जाते.माञ दुसरीकडे वडगाव पाॅंईट लगत असलेल्या जुन्या बस थाब्यांत व पुढे केलेल्या अतिक्रमणाचे काय ? याची सचिञ बातमी देऊनही याकडे दुर्लक्ष का ? पाॅकेट मिळते म्हणुन का अतिक्रमणधारकांना एसटी विभागाचे वरिष्ठ देतात आधार,अन् प्रवाशांना हक्काच्या थांब्यापासुन करत आहेत, निराधार अशी भावना जनतेची आहे. कारण हाळी, वडगाव,आनंदवाडी, मोरतळवाडी, चिमाचीवाडी, सुकणी, खरबवाडी, शेळगाव, टाकळगाव आदी गावातील प्रवाशांसाठी बसची वाट बघत ऊन,वारा व पावसात थांबायची वेळ येऊ नये म्हणुन अंदाजे 50 वर्षा पुर्वी हंडरगुळी ता.उदगीर येथे वडगा- व पाॅंईट येथे एक बस थांबा बांधलेला आहे.व या थांब्यात वरिल गावातील सर्वस्तरातील प्रवाशी एसटी बसची वाट बघत बसत व थांबत होते.तसेच एसटी बसेस पण याच थांब्यासमोर थांबत होत्या म्हणुन प्रवाशांची धावा – धाव होत नव्हती.पण गत कांही वर्षा पासुन हंडरगुळीचा हा जुना बसथांबा आतुन व बाहेरुन अतिक्रमणामध्ये दिसेनासा झाला असलातरी पण या जागेतील अतिक्रमण हे टी स्टाॅलला कॅंन्टीनला जागा म्हणुन केल्याचे हळी येथीलच एसटीचे कांही कर्मचारी नाव ओपन करु नये.या अटीवर सांगतात. तसेच कॅंन्टीनसाठी भाड्याने कॅंन्टीन ची जागा नाममाञ दरात भाड्याने घेणा-या व्यक्तीने ST च्या उदगीर व लातुरच्या अधिका-यास “घबाड”/ “गिफ्ट” देऊन अख्खे बस थांबाच अतिक्रमणात गिळंक्रत केल्याचेही हाळीतील एसटीचे कांही कर्मचारी नाव ओपन करायचे नाही.या एकमेव अटीवर सांगितले आहे.तसेच येथील बस थांब्यात व पुढे अतिक्रमण कांही लोकांनी केल्याने ऊन,वारा व पाऊस यांचा मारा सहन करत वयस्करांसह अन्य प्रवाशांना उघड्यावरच बसची वाट बघतच थांबावे लागते. बसथांबा संबंधित ऐसटी अधिका-याच्या अर्थ – पुर्ण आर्शिवादामुळेच अतिक्रमणाच्या अजगरी विळख्यात सापडल्यामूळे st चालक बसेस कुठेही थांबवताना व यामुळे वयस्क व सामान्य महिला प्रवाशांची पळापळ होताना बघून किव येते.माञ एसटी च्या अधिकारी वर्गाला याचे सोयरसुतक नाही का ? नवीन बसस्थानकाचा परिसर स्वच्छ , टाॅपटीप झाला.याचे कौतूक करणारी हाळी हंडरगुळीकर जनता हंडरगुळी येथील जुन्या बसथांब्यातील व पुढील अतिक्रमणाचे काय.व हे अतिक्रमण काढणारा “माईकालाल” व “वाघीनी ” चे “दूध” पिलेला “मर्द” अधिकारी एस.टी. विभाग लातुर येथे नाही का अशी चर्चा करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here