
सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
बल्लारपूर- आज दि. 15-01-24 सोमवार रोजी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात बॉटनिकल गार्डन विसापूर येथील 3-4 दिवसा पूर्वी नागरिकांनी रोजगारा साठी आंदोलन उभारण्यात आले होते. हे प्रकरण जिल्हाचे लाडके जिल्हाप्रमुख मा. संदिप गिऱ्हे यांच्या लक्षात येताच त्यांनी तुरंत विसापूर गाठलं व माहिती घेतली, बॉटनिकल गार्डन येथील अधिकाऱ्यांना धारेवर धरलं त्यानंतर अधिकारी वर्ग यांनी सोमवारी सर्व अधिकारी व नागरिक व आमचे जिल्हाप्रमुख यांची बैठक बोलवली असता त्यामध्ये. निर्णयामध्ये नागरिकांना यश मिळाले व लवकरात लवकर कामावर रुजू करून घेणार अशे आश्वासन दिले व विसापूर गावातील नागरिकांनी संदीप चे आभार मानले व आशीर्वाद दिला यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सिक्कीभैय्या यादव, तालुका समन्वयक प्रदीप गेडाम, व आजी माजी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














